करिअर ITI चे

 विश्व ITI चे, स्वप्न पूर्तीचे ---

ITI हे एक उत्तम करिअर पूर्ण करणारे शिक्षण आहे.आयटीआय (ITI) हा एक औद्योगिक प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. ITI चा Full Form हा “Industrial Training Institute” असा होतो, याला मराठीत “औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे म्हणतात. आयटीआय हि शासनाची मान्यताप्राप्त संस्था आहे,जी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील विविध तांत्रिक आणि विना तांत्रिक विषयांवर शिक्षण देते. या कोर्स मध्ये पुस्तकी ज्ञान कमी आणि व्यवहारिक म्हणजेच प्रॅक्टिकल ज्ञान जास्त शिकवले जाते. आयटीआय कोर्स शिकवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सरकारी व खाजगी प्रशिक्षण कॉलेज आहेत. यांद्वारे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात.


महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या वाढीमुळे हा आयटीआय कोर्स खूप लोकप्रिय आहे, दरवर्षी लाखो विद्यार्थी यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. ITI मध्ये फिटर, इलेकट्रीशियन, वेल्डर, वायरमन, टर्नर, असे अनेक ट्रेड्स असतात. ट्रेड नुसार विद्यार्थ्याला त्या-त्या गोष्टीचे प्रॅक्टिकल नॉलेज शिकवले जाते. प्रवेश घेताना विद्यार्थ्याला ट्रेड निवडण्याचा पर्याय असतो. आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया DVET महाराष्ट्र च्या सरकारी वेबसाईट वर ऑनलाईन घेतली जाते, यात विध्यार्थी आपल्या आवडीनुसार कॉलेज व ट्रेड निवडून प्रवेश अर्ज करू शकतो. या कोर्स चा Duration ६ महिने ते २ वर्षापर्यंत असू शकतो. ट्रेड नुसार कोर्स चा अवधी वेगळा असतो. फिटर, इलेकट्रीशियन, वायरमन या ट्रेड चा कालावधी २ वर्षाचा असतो, तर Sewing, Plumber, Welder हे ट्रेड १ वर्षाचे असतात. .ITI  साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी दहावी  उत्तीर्ण असावा,10 अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही काही ट्रेड्स उपलब्ध आहेत,8वी उत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थ्यांसाठीही काही ट्रेड्स उपलब्ध आहेत, व किमान मार्कांची कोणतीही अट नाही. विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न नक्की असतो की आयटीआय झाल्यावर पुढे काय करावे? आयटीआय चे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी  Diploma  Engineeringअभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्यातून आपण पुढे शिक्षण सुरू ठेऊ शकता. ज्यादाकरून विद्यार्थी आयटीआय झाल्यावर नोकरी करतात. यामध्ये पण दोन प्रकार पडतात, पहिली सरकारी नोकरी आणि दुसरी  खाजगी कंपनी मध्ये करतात ती Private Job.


आयटीआय झाल्यावर नोकरीसाठी Technical Sector आणि Non-Technical Sector च्या नोकऱ्या असतात. आयटीआय विद्यार्थ्यांसाठी MIDC मध्ये जास्त नोकऱ्या असतात. विद्यार्थ्यांच्या ट्रेड नुसार सेक्टर विद्यार्थ्यांना मिळतो, आणि त्यात ते नोकरी करतात. ITI सोबतच आपल्याकडे स्वतः चा व्यवसाय सुरू करण्याची संधी असते.  याप्रमाणे आपल्यासमोर नोकरी, व्यवसाय किंवा पुढील शिक्षण हे पर्याय उपलब्ध असतात.    ITI मध्ये खालील ट्रेड्स उपलब्ध आहेत                                                                          Building Maintenance

Bio technologist,Electronics Mechanic,Excavator Operator (Mining),Mechanic Repair & Maintenance of Two Wheeler's,

Mechanic Auto Electrical and Electronics,Sanitary Hardware fitter,Architectural Assistant,Carpenter,Domestic Painter,Foundry man Technician,Gold Smith,Industrial Painter,Interior Decoration and Designing,Marine Engine Fitter

Mason (Building Constructor),Mechanic Repair &Maintenance of Heavy Vehicles,Mechanic Repair & Maintenance of Light Vehicles,Mechanic Diesel Engine,Mechanic (Tractor),Mechanic Communication Equipment Maintenance,Mechanic Lens or Prism Grinding,Physiotherapy Technician,Plastic Processing Operator,Plumber,Pump Operator-cum-Mechanic,Rubber Technician,Sheet Metal Worker,Stone Mining Machine Operator,Stone Processing Machines Operator,Welder (Gas and Electric),Attendant Operator (Chemical Plant),Draughtsman (Civil), Draughtsman (Mechanical),Electrician,Electroplater,Fitter,Instrument Mechanic,Instrument Mechanic (Chemical Plant),Information Communication Technology, System Maintenance,Laboratory Assistant (Chemical Plant),Lift and Escalator Mechanic

Machinist,Machinist (Grinder),Maintenance Mechanic (Chemical Plant),Marine Fitter,Mechanic Mining Machinery

Mechanic Agricultural Machinery,Mechanic Computer Hardware,Mechanic Consumer Electronics Appliances,Mechanic-cum-Operator Electronics Communication System,Mechanic Industrial Electronics.  नोकरी, व्यवसाय, पुढील शिक्षण सर्व पर्याय ITI पूर्ण केल्यानंतर उपलब्ध आहेत


Comments